१९ ऑक्टोबर २०१५

जिल्हास्‍तरीय शालेय कुस्ती (१७ वर्षाखालील मुली) स्पर्धांचे दि.२३ ऑक्टोबर रेाजी आयोजन

      क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य अंतर्गत जिल्‍हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग, जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्‍यावतीने जिल्‍हास्‍तरीय शालेय कुस्‍ती (१७ वर्षाखालील मुली फ्री स्‍टाइल ) स्‍पर्धांचे आयेाजन करण्‍यात येणार आहे.
      दि.२३ ऑक्‍टोबर २०१५ रोजी सकाळी ०९.०० वा. जिल्‍हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे या स्‍पर्धां होणार आहेत. या स्‍पर्धांसाठी वजनगट पुढील प्रमाणे आहेत.
वजनगट –    ३८ किलोखालील,
            ४० किलोखालील,
            ४६ किलोखालील,
            ४९ किलोखालील,
            ५२ किलोखालील,
            ५६ किलोखालील,
            ६० किलोखालील,
            ६५ किलोखालील,
            ७० किलोखालील
        स्‍पर्धेबाबत अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांच्‍याशी ८८५६०९३६०८ या क्रमांकावर संपर्क साधण्‍यात यावा. या स्‍पर्धांचे प्रथम आयोजन तालुकास्‍तरावर करण्‍यात येणार आहे. जिल्‍ह्यातील खेळाडु, क्रीडा शिक्षक, शाळांनी नोंद घ्‍यावी व संबंधित तालुक्‍याचे तालुका समन्‍वयक किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्‍याशी तात्‍काळ संपर्क साधुन अधिकाधिक खेळाडुंनी तालुकास्‍तरीय स्‍पर्धेमध्‍ये सहभागी व्‍हावे असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित यांनी केले आहे.


                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...