०७ सप्टेंबर २०१५

१९ वर्षाखालील मुलींच्‍या जिल्‍हास्‍तर शालेय क्रीकेट स्‍पर्धांच्‍या आयोजन कार्यक्रमामध्‍ये बदल



जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने सन २०१५-१६ मध्‍ये आयोजित करण्‍यात येणा-या १९ वर्षाखालील मुलींच्‍या क्रीकेट स्‍पर्धाचे आयोजन  दि.१० ऑक्‍टोंबर २०१५ रोजी करण्‍याचे नियोजीत होते. तथापि राज्‍यस्‍तरीय व विभागस्‍तरीय स्‍पर्धाच्‍या आयोजन  कार्यक्रमामध्‍ये बदल झाल्‍याने जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धाच्‍या आयोजनामध्‍ये बदल करण्‍यात येत आहे. सुधारित बदलानुसार जिल्‍हास्‍तरीय शालेय क्रीकेट स्‍पर्धा १९ वर्षाखालील मुलींच्‍या स्‍पर्धाचे आयोजन दि.८ सप्‍टेंबर २०१५ रोजी जिल्‍हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे करण्‍यात येणार आहे. झालेल्‍या बदलाची सर्व शाळा, क्रीडा शिक्षक व खेळाडू यांनी याची नोंद घेवून सुधारित कार्यक्रमानुसार आपले संघ स्‍पर्धेला उपस्थित ठेवावे. अधि‍क माहितीसाठी जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे  संपर्क साधण्‍याचे आवाहान श्री.मिलिंद दिक्षित जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...