जिल्हाधिकारी
मा.श्री. ई रविंद्रन यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या
अधिकृत ब्लॉग चे उद् घाटन
सिंधुदुर्ग
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
मा. श्री. ई. रविंद्रन यांच्या हस्ते आज दिनांक १०/०७/२०१४ रोजी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ब्लॉगचे उद्घाटन करण्यात आले.
मा.
श्री. ई. रविंद्रन (IAS)
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग
//
शुभेच्छा
संदेश //
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी शालेय,
ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धांचे तालुका, जिल्हा,
विभाग तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येते. या स्पर्धांचे
आयेाजन करत असतांना जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये,
जिल्ह्यातील एकविध खेळांच्या जिल्हा संघटना व खेळाडू यांना स्पर्धांच्या
अयोजनाचे वेळापत्रकाची माहिती होणे, स्पर्धा
आयोजनाच्या कार्यक्रमामध्ये काही बदल झाल्यास तो बदल सर्व शाळा व खेळाडूंपर्यंत
जाणे आवश्यक असते त्याकरीता इतर मार्गांसह संबंधितांना ऑनलाईन माहिती मिळावी ही
गरज लक्षात घेवून या ब्लॉगची निर्मीती करण्यात आली आहे.
या
ब्लॉगव्दारे शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम,
शालेय खेळ महासंघ यांची नियमावली, जिल्हा
क्रीडा संकुल बाबत माहिती, तसेच क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणा-या
विविध युवक कल्याण विषयक उपक्रम व योजनांची माहिती सर्व शाळा,
महाविद्यालये, विविध खेळांच्या एकविध खेळ संघटना,
खेळाडू, क्रीडा मंडळे,
युवक मंडळे, इत्यादींपर्यंत पोहचण्यासाठी सुध्दा होणार
आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये,
एकविध खेळांच्या संघटना, क्रीडा कार्यकर्ते,
क्रीडा संघटक, खेळाडु, क्रीडा मंडळे,
युवक मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय
कार्यालये यांनी लाभ घ्यावा सदर उपक्रमास माझ्या शुभेच्छा !!!!!
(ई.रविंद्रन)
जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग
(ई.रविंद्रन)
जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग
